वैजापूर, (प्रतिनिधी) : वैजापूरसह संपूर्ण मराठवाडयात प्रसिद्ध असलेल्या हजरत नौगाजी बाबा उरुसाला १५ एप्रिल रोजी संदल मिरवणूकीने सुरुवात झाली.
असलेल्या हजरत सैय्यद शहा रुकनोद्दीन शहीद उर्फ नौगाजी बाबा उरूस म्हणजे वैजापूर करांसाठी एक पर्वनीच या दर्गाची खास बात म्हणजे नौगाजी बाबा ची मजार ची सत्तावीस फूट आहे. नौगाजी बाबा च्या उरुसासाठी मराठवाडा खान्देश मुंबई तसेच पर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.
नवसाला पावणारा पीर म्हणून नौगाजी बाबा यांची ख्याती आहे मूल बाळ न होणे लग्न जमणे बाहेर ची करणी बाधा यावर नक्कीच भक्तांना आराम मिळतो. येथे आल्यावर भक्त आपला नवस फेडण्यासाठी खाजातुळा करून आपला नवस पूर्ण करतात मानसिक आजार असलेले अनेक लोक येथे तीन ते सहा महिने नौगाजी बाबा दर्गा मध्ये वास्तव्य तब्बल ५०० वर्षाची परंपरा करतात.
वैजाराणी हुन पडले वैजापूर नाव नौगाजी बाबा एक सुफी संत होते. दूर देशातून वैजापूरला धर्म प्रसार करता आले असता, वैजापूरला आले त्यावेळेस वैजापूरला एक जुलमी राजा होता, तो येथील जनतेवर अन्याय करत असेल नौगाजी बाबा यांनी त्या राजापासून जनतेची सुटका केली तेव्हा वैजा राणी बाबा ची भक्त झाली व तेव्हापासून वैजापूर हे नाव पडले.
नौगाजी बाबा उरुसात रहाटपाळणे, ब्रेकडान्स, रेल्वे सर्कस, पन्नालाल, मौत का कुवा, खेळणी, खाद्य पदार्थ खाजा इत्यादी दुकाने मोठ्या प्रमाणात लागतात. पंधरा दिवस चालण्याऱ्या या मेळ्यात कोट्यावदीची उलाढाल होते. तीन दिवस मुंबई हैद्राबाद भोपाळ शहरातून आलेले कलाकार कव्वाली चा कार्यक्रम सादर करतात. संपूर्ण मैदान कव्वाल ऐकन्यासाठी रसिक प्रेमिनी भरून जाते. अखेरच्या दिवशी कुस्तीच्या दंगलचा कार्यक्रम पार पडतो.












